Paris Olympic अखेरचे! हॉकी गोलकिपर पीआर श्रीजेशची निवृत्ती

Pranali Kodre

निवृत्ती

भारतीय हॉकी संघाचा दिग्गज गोलकिपर पीआर श्रीजेशने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानं सांगितलं की आगामी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ही त्याची अखेरची स्पर्धा असेल.

PR Sreejesh | Sakal

कृतज्ञता

त्यानं निवृत्तीची घोषणा करताना भावूक पोस्ट शेअरकेली आहे. त्यानं म्हटलंय, 'आंतरराष्ट्रीय हॉकीमधील माझ्या अंतिम अध्यायाच्या उंबरठ्यावर मी उभार आहे, यावेळी माझं हृदय आठवणींनी आणि कृतज्ञतेने भरले आहे.'

PR Sreejesh | Sakal

वडिलांचा त्याग

याबरोबरच त्याने वडिलांच्या त्यागाबाबत लिहिले, 'मला अजूनही आठवते की माझ्या वडिलांनी माझ्या किटसाठी आमची गाय विकली होती. त्यांच्या या त्यागानं माझ्या आत एक आग पेटवली आणि मला आणखी मोठी स्वप्न पाहाण्याची प्रेरणा दिली.

PR Sreejesh | Sakal

पहिला दौरा

'माझा ऑस्ट्रेलियाचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा आश्चर्य आणि उत्साहाने भरलेला होता. एक युवा खेळाडू परदेशी भूमीवर तेव्हा स्वप्नांचा पाठलाग करत होता.'

PR Sreejesh | Sakal

...तो टर्निंग पाँइंट

श्रीजेशने पुढे टर्निंग पाँइंटबद्दल लिहिले, 'साल २०१२ मधील लंडन ऑलिम्पिक ही कठोर शिकवण होती. आम्ही सर्व सामने हारलो होतो, ती कडू गोळी आम्हाला गिळावी लागली. पण ती आयुष्याला वळण देणारी घटना ठरली. त्यावेळी पराभवातून पुन्हा उठण्याचा आणि कधीही माघार न घेण्याचा संकल्प मला त्यावेळी सापडला.'

PR Sreejesh | Sakal

पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय

पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यानं लिहिलं, 'पहिली आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक पाकिस्तानविरुद्ध रोमांचक शुटआऊटमध्ये जिंकणे हा ऐतिहासिक क्षण होता. त्यामुळे आमचे नाव इतिहासात नोंदवले गेले. हा विजय फक्त माझा नव्हता, तर प्रत्येक भारतीयाचा होता.'

PR Sreejesh | Sakal

नेतृत्व

भारतीय संघाचं नेतृत्व करणं आणि जगातील सर्वोत्तम गोलकिपर म्हणून ओळखले जाणे, हा मोठा सन्मान असल्याचेही त्याने सांगितले.

PR Sreejesh | Sakal

ऑलिम्पिक पदक

टोकीयो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक यशाबद्दल त्यानं लिहिलं, 'टोकीयो ऑलिम्पिक २०२० मधील यश, आमचं कांस्यपदक, ही स्वप्नपूर्ती होती. त्यावेळीचे अश्रू, आनंद आणि अभिमान, सर्व मौल्यवान आहे.'

PR Sreejesh | Sakal

अखेरची स्पर्धा

आगामी पॅरिस ऑलिम्पिक ही भारतासाठी अखेरची स्पर्धा असल्याचं सांगताना त्याने कुटुंब, सहकारी, प्रशिक्षक आणि चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी सदैव कृतज्ञता व्यक्त केली.

PR Sreejesh | Sakal

रोहित शर्मा कुटुंबासह घेतोय सुट्ट्यांची मजा, पाहा Photo

Rohit Sharma with Family | Instagram
येथे क्लिक करा