Pranali Kodre
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात गॉलला २६ सप्टेंबरपासून दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.
या सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव ३९.५ षटकात अवघ्या ८८ धावांवर संपला.
या डावात श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने १८ षटकात ६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा हा केवळ १६ वा कसोटी सामना आहे.
त्याने १६ कसोटीत ९ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स डावात घेतल्या आहेत. त्यामुळे त्याने आर अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
पहिल्या १६ कसोटींमध्ये सर्वाधिकवेळा डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत तो अश्विनसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
अश्विननेही पहिल्या १६ कसोटींमध्ये ९ वेळी ५ विकेट्स घेतल्या होत्या.
या यादीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे क्लॅरी ग्रिमेट आहेत, त्यांनी पहिल्या १६ कसोटींमध्ये १० वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.