kimaya narayan
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फुलवंती या सिनेमामुळे चर्चेत आहे. गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
प्राजक्ताने या सिनेमाची निर्मिती केली आहे तर बाबासाहेब पुरंदरेच्या फुलवंती या कादंबरीवर या सिनेमाची कथा बेतली आहे.
फुलवंती नावाची नृत्यांगना आणि पेशव्यांच्या दरबारातील विद्वान पंडित यांच्यातील अनोख्या पैजेची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
11 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज झालाय आणि प्रेक्षक या सिनेमाला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
या सिनेमाच्या निमित्ताने प्राजक्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने या सिनेमाच्या शूटिंग आणि रिलीजदरम्यान एकही नवीन प्रोजेक्ट स्वीकारलं नसल्याचं सांगितलं. इतकच नाही परदेशात चित्रित होणारे सिनेमेही तिने नाकारले असं ती म्हणाली.
प्राजक्ताच्या या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.