प्राजक्ताकडून राज ठाकरेंना शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Prajakta Mali

इन्स्टाग्रामवर पोस्ट करत प्राजक्ता म्हणते, आदरणीय “आपणांस” वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…

''आपणाला जे करण्याची इच्छा आहे, ते काम हातात यावं. काम करताना आनंद मिळावा...''

''त्यातून समाधान लाभावं; ह्याच वाढदिवसानिमित्त माझ्याकडून व ‘प्राजक्तराज परिवाराकडून’ शुभकामना.''

अशा शुभेच्छा प्राजक्ताने दिल्या. ''फोटोत दिसताय त्याप्रमाणे सदैव हसत रहा, प्रसन्न रहा..'' असंही ती म्हणते

प्राजक्ताने कायमच मनसे पक्षाला समर्थन दिलेलं आहे

तिच्या प्राजक्तराज या ब्रँडचा शुभारंभ राज ठाकरेंच्या हस्ते झालेला होता

अनेक मराठी कलाकारांना राज ठाकरे आणि मनसेचं आकर्षण यापूर्वीही दिसून आलेलं आहे