Prakash Ambedkar : 'वंचित'चे नेते प्रकाश आंबेडकर या कॅमेऱ्यातून काय बरं टिपत असतील?

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकींचा शंखनाद कधीही होण्याची शक्यता आहे. अशातच निवडणुका अगदी तोंडावर आल्या असतानाही वंचित बहुजन आघाडीचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश झालेला नाहीये.

Prakash Ambedkar Navegaon Bandh Bhandara

मात्र, येत्या दोन-तीन दिवसांत वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत युती होईल, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Prakash Ambedkar Navegaon Bandh Bhandara

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतचा तिढा अद्याप कायम असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाहीये.

Prakash Ambedkar Navegaon Bandh Bhandara

दरम्यान, नवेगाव बांध (ता. साकोली, जि. भंडारा) येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच भेट दिली.

Prakash Ambedkar Navegaon Bandh Bhandara

यावेळी येथील निसर्गाचं सौंदर्य पाहून हा क्षण त्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे.

Prakash Ambedkar Navegaon Bandh Bhandara

प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलंय. तर, काही नेटकऱ्यांनी त्यांचं 'दूरदृष्टीचा नेता' असं वर्णन केलंय.

Prakash Ambedkar Navegaon Bandh Bhandara

खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर बांधण्यासाठी काळा दगड कुठून आणला? काय सांगतात संशोधक?

येथे क्लिक करा