Anuradha Vipat
प्रथमेश आणि क्षितिजा यांचा लग्नसोहळा २४ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला होता.
आता प्रथमेश त्याच्या शूटिंगमधून वेळ काढून बायकोच्या माहेरी कोकणात गेला आहे.
या जोडप्याने त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे.
वटपौर्णिमाचा खास व्हिडीओ प्रथमेशची पत्नी क्षितिजाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“फक्त सात जन्मासाठी… प्रत्येक जन्मासाठी! तूच पाहिजेस प्रथमेश… वडाच्या झाडासारखं आपलं नातं दीर्घायुषी असावं. जन्मोजन्मी फक्त तुझीच साथ असावी… वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा… सौ. क्षितिजा प्रथमेश परब” असं सुंदर असं कॅप्शन क्षितिजाने या व्हिडीओला दिलं आहे
प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख सोशल मीडियावर झाली होती
तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.