सकाळ डिजिटल टीम
गरोदरपणात महिलांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आई आणि जन्माला येणारे मूल दोघांनाही पोषक तत्वांची गरज असते
गर्भवती महिलांना सतत थकवा जाणवतो. त्याच वेळी, गर्भधारणेदरम्यान काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. चला तर मग जाणून घेऊया गरोदर महिला कोणते स्नॅक्स खाऊ शकतात.
गर्भधारणेदरम्यान अंड्याचे सेवन मुलाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
भाजलेले चणे हा देखील एक पर्याय तुम्ही निवडू शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि फोलेट सारखे पोषक घटक असतात.
तुम्ही गरोदरपणात पीनट बटरचे सेवन देखील करू शकता.
दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. गरोदरपणात दही पचनसंस्था तंदुरुस्त ठेवते.
बदाम, काजू, पिस्ता किंवा अक्रोड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये प्रथिने, फायबर, आणि खनिजे भरपूर असतात जे शरीराला प्रचंड फायदे देतात.
गरोदरपणात कलिंगड खाणे खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने तुम्ही हायड्रेटेड राहता. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते.