कार्तिक पुजारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात ओळखले जाऊ लागलेले नेते ठरत आहे. ते जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत.
अप्रूवल रेटिंग सर्वे करणाऱ्या इप्सोस इंडियाबस या संस्थेने मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये वाढ केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये ७५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळवली आहे.
विशेष म्हणजे डिसेंबर २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. त्यात आता १० टक्क्यांची वाढ झाली आहे.
२०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांना ६० टक्के अप्रूवल रेटिंग होती.
फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांना ६७ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती.
म्हणजेच पंतप्रधान मोदी यांना दिवसेंदिवस मान्यता वाढत असल्याचं दिसत आहे.