Anuradha Vipat
लोकप्रिय असलेल्या मराठी अभिनेत्री म्हणून प्रिया बेर्डेंना ओळखले जाते.
आता दिवाळीनिमित्त त्यांनी काही खास जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
प्रिया बेर्डें म्हणाल्या की, आमच्या घरी दिवाळीची मजा पारंपरिक गोड पदार्थ आणि फराळाशिवाय अपूर्ण असते.
प्रिया बेर्डें म्हणाल्या की, मी स्वतःच चकल्या, करंज्या, लाडू, आणि चिवडा बनवते.
लक्ष्मीकांतला तर माझ्या हातचा फराळ विशेष आवडायचा. खास करून लाडू त्याला आवडायचे. तो मला मदतही करायचा, अशी आठवणही प्रिया बेर्डेंनी सांगितली.
पुढे प्रिया बेर्डेंनी सांगितले की “दिवाळी आली की रांगोळी आलीच. मला रांगोळी काढायला खूप आवडते. पूर्वी मी मोठ्या रांगोळ्या काढायची आणि लक्ष्मीकांत त्या रांगोळ्यांचे कौतुक करायचा.
पुढे प्रिया बेर्डेंनी सांगितले की, दरवर्षी मी मनापासून रांगोळी काढते.