Anuradha Vipat
प्रिया बापट आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.
प्रियाने आता एका मुलाखतीत फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींबद्दलविधान केलं आहे.
मी कधीच फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे असं तिने सांगितलं आहे.
तसेच मुलाखतीत मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा. कोणी ठरवलेत सौंदर्याचे हे निकष?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.
पुढे तिने सौंदर्याच्या साचेबद्ध निकषांनुसार विशिष्ट शरीरयष्टीबाबत तिचं मत व्यक्त केलं
मी पिअरशेप बॉडी असलेली व्यक्ती आहे. माझी आज्जी अशीच होती, माझी आत्याही अशीच आहे. त्यामुळे मी जशी आहे तशी ठिक आहे,” असं प्रिया या मुलाखतीत म्हणाली.