Sudesh
मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रियदर्शिनी इंडलकरचं नाव पुढे येत आहे.
प्रियदर्शिनीने 'सकाळ'शी बोलताना आपल्या छंदाविषयी सांगितलं.
प्रियदर्शिनीला व्हिडिओ एडिटिंगचा छंद आहे. कोणतेही फुटेज घेऊन, ते जोडून त्यातून काहीतरी अर्थपूर्ण बनवणं हे तिला आवडतं.
आपल्या इन्स्टाग्राम रील्स देखील ती स्वतःच एडिट करते, तसंच सोबतच्या सहकाऱ्यांना देखील ती रील्स एडिट करून देते.
लहानपणापासूनच तिला एडिटिंगची आवड आहे. त्यांच्या घरातील कॅमेऱ्याचा वापर करुन ती खेळण्यांचं शूटिंग करत, आणि त्यांचे व्हिडिओ एडिट करुन सीन तयार करत.
यानंतर ती कुणाच्या वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमाचे फोटो जोडून त्याचे व्हिडिओ तयार करू लागली. यामध्ये गाणी आणि वेगवेगळे पॅटर्न ट्राय करणं तिला आवडत होती.
प्रियदर्शिनीने एडिटिंगचं शिक्षण घेतलेलं नाही, प्रॅक्टिस करत करतच ती एडिटिंग शिकली. तिचा भाऊ वरुण देखील तिला यामध्ये मार्गदर्शन करत.
प्रियदर्शिनी म्हणते की सिनेमा हे एडिटिंगचं माध्यम आहे. ज्या दिग्दर्शकाला एडिटिंग चपखल माहिती असतं, तो आपल्या टीमकडून चांगलं काम करून घेऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.