Anuradha Vipat
ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा एक निर्माती म्हणून जागतिक स्तरावर काम करणार असून डॉक्युमेंटरी टू किल अ टायगरची ती निर्माती झाली आहे.
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचरसाठी ऑस्कर नामांकन मिळविलेल्या या डॉक्युमेंटरीने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांच्या धाडसी लढाईची मार्मिक कथा सांगितली आहे.
प्रियांका चोप्राने तिच्या या नव्या कामाची घोषणा करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे
नेटफ्लिक्स टू किल ए टायगरच्या जागतिक रिलीजसाठी सगळेच उत्सुक आहेत.
प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.
पोस्ट करत प्रियांकाने म्हटलं आहे की, मला हे जाहीर करताना खूप अभिमान वाटतो की आता मी ऑस्कर नामांकित चित्रपट 'टू किल अ टायगर'चा देखील एक भाग आहे.