Anuradha Vipat
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही पती निक जोनाससोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी भारतात आली.
या लग्नसोहळ्यात प्रियांका-निकच्या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे
मात्र प्रियांकाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्राने थाटामाटात लग्न केलं होतं.
त्यावरुन बहिणीच्या लग्नाला यायला वेळ नव्हता, मात्र आता अंबानींच्या लग्नासाठी बरोबर वेळ मिळाला, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा सुरू आहे.
अनंत आणि राधिकाच्या लग्नात प्रियांकाने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता.
अनंतच्या वरातीत प्रियांका मनसोक्त नाचतानाही दिसली.