प्रियांका गांधींची लव्ह स्टोरी माहितंय का?

सकाळ डिजिटल टीम

प्रियांका गांधी ह्या वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहेत. राहुल गांधींनी रायबरेलीतून संसदेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रियांका गांधींबद्दल सध्या सोशल मीडियात चर्चा होत आहेत. त्यांच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेऊया.

रॉबर्ट वाड्रा आणि प्रियांका गांधी दिल्लीतील ब्रिटीश स्कूलमध्ये शिकत होते. एका मित्राच्या घरी त्यांची भेट झाली होती.

रॉबर्ट वाड्रा आणि प्रियांका यांची पहिली भेट वयाच्या तेराव्या वर्षी झाली. त्यांच्यातल्या मैत्रीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं.

रॉबर्ट वाड्रा आणि प्रियांका यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. रॉबर्ट वाड्रा यांच्या वडिलांचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता, परंतु नंतर तो विरोध मावळला.

दोघांनीही मागे एका मुलाखतींमध्ये लहानपणीपासूनच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. परंतु त्या दोघांनी तेव्हा ही गोष्ट कुणालाही कळू दिली नव्हती.

फेब्रुवारी 1997 मध्ये दोघांनी लग्न केलं. आज त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

रॉबर्ट वाड्रा हे मोठ्या उद्योगपती घराण्यातील आहेत तर प्रियांका ह्या देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत.