Pranali Kodre
प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामाचा लिलाव १५ आणि १६ ऑगस्ट मुंबईत झाला.
या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागलेली दिसली, तर काही खेळाडूंवर लाखोंची बोली लागली.
प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामाच्या लिलावात सर्वाधिक बोली सचिन तनवर याच्यावर लागली. त्याच्यावर तमिळ थलायवाजने २.१५ कोटी रुपयांची बोली लागली.
त्याच्यापाठोपाठ मोहम्मदरेझा शादलू चियानेह याला हरियाणा स्टिलर्सने २.०७ कोटी रुपयांना खरेदी केले.
सर्वोच्च बोली लागलेल्या खेळाडूमध्ये तिसऱ्या क्रमांकावर गुमान सिंग आहे. त्याला गुजरात जायंट्सने १.९७ कोटी रुपयांना खरेदी केले.
चौथ्या क्रमांकावर पवन सेहरावत असून त्याला तेलुगु टायटन्सने १.७२५ कोटी रुपयांना संघात घेतलं.
पाचव्या क्रमांकावर भरत आहे. त्याला युपी योद्धाने १.३० कोटी रुपयांना खरेदी केले.