Swadesh Ghanekar
सचिन तनवर आणि इराणचा मोहम्मद्रेझा या दोघांनाच दोन कोटींची किंमत मिळाली.
सचिन तनवरला तमिळ थलायव्हाजने २.१५ कोटी मोजले. तो कबड्डी लीगमधील दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
रत्नागिरीच्या अजिंक्य पवारने एक कोटींच्यावर भाव मिळवला. बंगळुरू बुल्स संघाने त्याच्यासाठी १.१० कोटी मोजले.
लिलावाच्या पहिल्या दिवशी सचिनला अनपेक्षित लॉटरी लागली. तीन वर्षांपूर्वी पाटणाने त्याला ८४ लाख दिले होते. आज त्याने दोन कोटी १५ लाखांची किंमत मिळवली.
इराणच्या मोहम्मद्रेझा शादलोईसाठी हरयाणा स्टीलर्सने २.०७ कोटी मोजले.
गुमान सिंग (१.८७ कोटी ) आणि अनुभवी पवन शेरावत ( १.७२ कोटी) यांना अनुक्रमे गुजरात जायंट्स व तेलगू टायटन्सने घेतले.
यूपी योद्धाने भरत हुडाला १.३० कोटींत, तर बंगळुरू बुल्सने मनिंदर सिंगला १.१५ कोटी रुपयांत आपल्याकडे घेतले.
सुनील कुमारसाठी यू मुंबाने १.०१५ कोटी, तर अजिंक्य पवारसाठी बंगळुरू बुल्सने १.१०७ कोटी मोजले.
अनुभवी परदीप नरवाल (७० लाख) आणि फझल अत्राचली ( ५० लाख) यांना कमी बोली लागली. ( फोटो क्रेडीट - PKL social media)