धनश्री भावसार-बगाडे
सहसा मुलींनी पुढाकार घेऊन प्रपोज करण्याचे प्रमाण तुलनेने फार कमी असते.
बहुतांशवेळा मुलंच पुढाकार घेताना दिसतात.
अगदी दोघं चांगले मित्र-मैत्रिण असले तरी प्रपोजल आल्यावर मुलगी लगेच उत्तर कधीच देत नाही. कायम वेळ लावते असा अनुभव बहुतांश वेळा येतो.
मैत्रिणीच्या मनात आपल्याविषयी काय आहे याचा अंदाज जरी मुलांना असला तरीही तिच्याकडू आलेला हा पॉज मात्र त्याला गोंधळात टाकतो.
काहीवेळा असंही अनुभवायला मिळतं की, होकाराची अपेक्षा असूनही जसं काही अनपेक्षित प्रपोजल आलंय असं ठरवत मुली आधी नकारच देऊन टाकतात.
पण नंतर काही दिवसांनी त्यांच्या वागण्या बोलण्यात अपेक्षित बदल दिसू लागतो आणि मेरी ना में ही हां थी... अशा आशयाचे उत्तर मिळते, किंवा घडू लागते.
बहुतेक वेळा मुली या मुलांपेक्षा अधिक इमोशनल असताता. त्या नात्यामध्ये भावनिकरित्या जास्त गुंतलेल्या असतात.
मुली उत्तर द्यायला उशीर का करतात याचं उत्तर बऱ्याचदा विचार करायला वेळ हवा असं मिळतं.
काही अपवाद वगळले तर मुलींचा भर हा नातं टिकवण्यावर असतो. त्यामुळे जोडण्याआधी त्या वेळ घेतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.