देशात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका, या आयुर्वेदिक उपायांनी करा स्वतःचा बचाव

Aishwarya Musale

कोरोना

देशात पुन्हा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. कोविडचा नवीन प्रकार झपाट्याने पसरत आहे. कोविड विषाणू आजारी आणि वृद्धांसाठी गंभीर ठरू शकतो.

आयुर्वेदिक उपाय

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे काही जणांचा मृत्यूही झाला आहे. अशा परिस्थिती आयुर्वेदिक उपाय करुन तुम्ही स्वतःचं संरक्षण करु शकता, कसं ते जाणून घ्या.

मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळवा

हिवाळ्यात आपल्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर अनेक आजारही उद्‌भवतात. हेच कारण आहे की, हिवाळ्यात लोक जास्त आजारी पडतात. सूर्यप्रकाश एखाद्या औषधापेक्षा कमी नाही.

सूर्यप्रकाश

फक्त 10 ते 15 मिनिटांच्या सूर्यप्रकाशामुळे मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. सूर्यप्रकाश अनेक आजारांपासून तुमचं रक्षण करतो. सूर्यप्रकाश घेतल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यामुळे बीपी आणि वजनही नियंत्रित राहते.

प्रतिकारशक्ती वाढवा

व्हिटॅमिन सी साठी लिंबूवर्गीय फळे खा. व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी काही वेळ उन्हात बसा. हिरव्या भाज्या खा. हळदीचे दूध प्या. फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी प्राणायाम करा. घराबाहेर पडताना मास्क वापरा

फुफ्फुस मजबूत करा

रोज प्राणायाम करा. गरम पाणी प्या, थंड पाणी पिऊ नका. तुळशीच्या पानांचे पाणी  पाणी प्या. दही आणि ताक खाऊ नये. तळलेले अन्न टाळा.

केरळ

केरळमध्ये कोरोनाचे सब-व्हेरियंट JN.1 चं प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटक आणि तामिळनाडू ही शेजारील राज्य सतर्क झाली आहेत. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

कोविड-19

कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये आढळून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली.

मुलांना गणिताची भीती का वाटते ? हा असू शकतो आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा