सकाळ डिजिटल टीम
वारंवार आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये पल्मोनरी एम्बोलिझम (पीई) या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदले आहे.
'पीई' म्हणजे एक प्रकारची रक्ताची गुठळी असते. ती फुफ्फुसांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमणीमध्ये अडथळे निर्माण करते. त्यातून फुफ्फुसांना होणारा रक्तप्रवाह रोखला जातो.
फुफ्फुसातील रक्ताच्या गाठी विरघळवणारी पारंपरिक औषधे फार उपयुक्त ठरत नाही, त्यामुळे मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी या उपचार पद्धतीमध्ये कॅथेटरचा वापर करून छोट्या उपकरणाच्या साह्याने रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्ताच्या गुठळ्या काढल्या जातात.
लांबचा हवाई प्रवास करताना दर अर्ध्या तासाने वेगाने चालणे, सतत पाणी पिणे आणि विमान प्रवासादरम्यान मद्य पिणे टाळणे.
चार तासांच्या प्रवासानंतर होणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त दोन तासांच्या प्रवासात या आजाराचा धोका २६ टक्क्यांनी वाढतो.
'व्हीटीई'ला प्रतिबंध करण्यासाठी, विशेषतः विमान प्रवासादरम्यान,' ग्रॅज्युएटेड कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज' सारख्या कमी-जोखीम प्रतिबंधक उपायांची व्यवस्था करावी.
वेगवेगळी आरोग्य पार्श्वभूमी असलेल्या २१ ते ७२ वर्षे वयोगटातील रुग्णांचा अभ्यास केला असता, तरुण लोकसंख्येला याचा वाढता घोका आहे, असे दिसून आले.
'पल्मोनरी एम्बोलिझम' हा आजार जीवघेणा ठरू शकतो. हृदयविकाराशी संबंधित मृत्यूचे तिसरे कारण म्हणूनही याचा उल्लेख केला जातो. यामुळे या आजारावर तत्काळ उपचार महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.