संतोष कानडे
वर्षा पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यात अनेक मनमोहक ठिकाणं आहेत
त्यातलाच एक आहे माशळेजचा घाट, सध्या हा परिसर हिरवाईने नटला आहे
माळशेज घाटामध्ये काही दिवसांपूर्वी दरड कोसळली होती
या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे काळजी घेऊन आणि निर्बंध बघूनच जाणं गरजेचं आहे
पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते
या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो
येथे फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात
माळशेज घाटातल्या रेस्ट हाउसच्या मागे हरिश्चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे
कल्याण-माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गावात रस्ता संपतो येथे हॉलिडे रिझॉर्ट झाले आहे
पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागते
स्थानिक वाटाड्या सोबत असेल तर धबधब्यापर्यंत जाता येते