पुणेकरांनी पोलिसांचे आदेश धुडकावले; बंदी घालूनही स्काय लँटर्नचा खच

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीनिमित्त पुण्यातील सारसबागेत मोठी गर्दी पाहायला मिळाली.

गेली २ वर्ष निर्बंध असल्यामुळे दिवाळी पाडव्याला गर्दी नव्हती. यंदा मात्र सारसबाग हाऊसफुल्ल झालेली पाहायला मिळाली.

दिवाळीत चायनीज लँटर्नवर बंदी असून सुद्धा सारसबागेबाहेर यांचा ढीग पाहायला मिळाला.

नोव्हेंबरपर्यंत लँटर्न (उडते कंदिल) उडवण्यावर व विक्री करण्यास बंदी घातली आहे.

लँटर्नच्या तळाशी ज्वालाग्रही पदार्थ लावून ते हवेत सोडण्यात येतात. मात्र, या लँटर्नमुळं झाडांना धोका असतो तसेच आगीच्या घटना देखील घटना घडतात.

मात्र आज पाडव्यानिमित्त पुण्यातील सारसबागेबाहेर या कंदिलांचा ढीग पाहायला मिळाला.

संपूर्ण रस्त्यावर या कंदिलांच्या पिशव्या तसेच पोलिसांनी जप्त केलेले कंदील पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sarasbaug | Sakal