Monika Lonkar –Kumbhar
सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढल्याने आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
सध्या पुण्यात झिका व्हायरसने चिंता वाढवली असून ७ रूग्णांना झिकाची लागण झाली आहे.
एका बाजूला झिकाचा धोका वाढत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात डेंग्यूचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे, आरोग्याची काळजी घेणे गरेजेच आहे.
डासांमार्फत पसरणारा डेंग्यू आणि झिकाचा धोका टाळण्यासाठी डासांना पळवून लावणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने जाळू शकता.
घरात कापूर जाळल्यास त्याच्या उग्र वासाने कीटक, डास पळून जातात.
जास्त डास असतील तर तुम्ही घराच्या कोपऱ्यात लसूणाची पेस्ट ठेवू शकता. यामुळे, डास पळून जातील.