Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेतील 58 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने पंजाब किंग्स विरुद्ध धरमशाला 60 धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
मात्र, पंजाबचा हा आयपीएल 2024 मधील 12 सामन्यांमधील आठवा पराभव ठरला.
त्याचमुळे पंजाबला आयपीएल 2024 प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले आहे.
विशेष म्हणजे पंजाब संघाचे प्लेऑफच्या पूर्वी आयपीएल हंगामतील आव्हान संपुष्टात येण्याचीही एकूण 15 वी वेळ आहे.
तसेच पंजाबला गेल्या सलग 10 हंगामात प्लेऑफमध्ये पोहचला आलेलं नाही. पंजाबने अखेरीस प्लेऑफमध्ये 2014 साली प्रवेश केला होता, त्यावेळी त्यांना अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
तसेच 2014 आधी 2008 साली झालेल्या आयपीएल हंगामात पंजाबने अंतिम 4 संघात स्थान मिळवले होते.
मात्र, 2008 आणि 2014 व्यतिरिक्त 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 या 15 हंगामात प्लेऑफ गाठता आलेली नाही.
त्याचबरोबर आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळणाऱ्या पण अद्याप एकही विजेतेपद न जिंकता आलेल्या तीन संघांपैकी एक पंजाबही आहे. पंजाबव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स आणि बेंगळुरू या संघांनाही अद्याप आयपीएल विजेतेपद जिंकता आलेलं नाही.