Anuradha Vipat
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल्र’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
आता माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने सोशल मीडियावर ट्रेंड होताना पाहायला मिळाले आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या डॉ. श्रीराम नेने यांनी नुकताच पुरणपोळी बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
विशेष म्हणजे ही पुरणपोळी त्यांनी स्वतः बनवली आहे.
होळीच्या निमित्ताने त्यांनी हा पुरणपोळ्यांचा घाट घातला होता
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलं की, ‘होळी हा कुटुंबासोबत साजरा करण्याचा सण आहे. महाराष्ट्रातील घरोघरी बनवली जाणारी ही खमंग पुरणपोळी कशी बनवायची? चला आज तुम्ही माझ्याकडून शिकून घ्या...’