Pranali Kodre
भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यात आर अश्विनने रविंद्र जडजाबरोबर पहिल्या दिवशी १९५ धावांनी नाबाद भागिदारी करत १०२ धावांची नाबाद खेळी केली.
अश्विनचे हे कसोटीमधील सहावे शतक ठरले, तर चेन्नईत केलेले कसोटीतील दुसरे शतक ठरले.
त्यामुळे अश्विन एकाच मैदानात दोन किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा डावात ५ विकेट्स घेणारा पाचवा अष्टपैलू ठरला आहे.
अश्विनने चेन्नईमध्ये दोन शतके करण्याबरोबरच चारवेळा डावात ५ विकेट्सही घेण्याचा कारनामाही केला आहे.
यापूर्वी गारफिल्ड सोबर्स यांनी हेडिंग्ले येथे कसोटीत दोन शतके आणि दोन वेळा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
भारताचे कपिल देव यांनीही चेन्नईमध्येच दोन शतके आणि दोन वेळा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
ख्रिस केर्न्सने ऑकलंडमध्ये कसोटीत दोन शतके आणि दोन वेळा ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
इयान बॉथम यांनीही हेडिंग्ले येथे दोन शतके आणि तीन वेळा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.