सकाळ डिजिटल टीम
भारताचा फीरकीपटू आर आश्विनने भारत-बांगलादेश कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावले, तर बांगलादेशच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवस अखेरपर्यंत ३ विकेट्स घेतले आहेत.
या विकेट्ससोबत त्याने कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर असलेल्या कर्टनी वॉल्श यांची बरोबरी केली आहे. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल जाणून घ्या.
श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये ८०० विकेट्स घेतल्या आहेत व या यादीत तो अव्वल स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वार्न १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स घेऊन यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
१८८ कसोटी सामन्यांमध्ये ७०४ विकेट्स घेणारा इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसन यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
भारताचे दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ विकेट्स घेऊन यादीत चौथ्या स्थानावर आहेत.
इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड १६७ कसोटी सामन्यांतील ६०४ विकेट्ससह यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ग्लेन मॅकग्राने १२४ कसोटी सामन्यांमध्ये ५६३ विकेट्स घेतले आहेत व यादीत सहावे स्थान मिळवले आहे.
यादीत सातव्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने १२९ कसोटी सामन्यांमध्ये ५३० विकेट्स घेतले आहेत.
भारताच्या आर आश्विनने आपल्या १०१ व्या कसोटी सामन्यांत ५१९ विकेट्सचा आकडा पूर्ण करत दिग्गजांच्या यादीत आठवे स्थान मिळवले आहे.
१३२ कसोटी सामन्यांत ५१९ विकेट्स घेणारे वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श यादीत आठव्या स्थानावर आहे.