R Ashwin ची मुरलीधरनशी बरोबरी! सचिन-विराटलाही न जमलेला केला पराक्रम

Pranali Kodre

भारत विरुद्ध बांगलादेश

भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश संघाविरुद्ध कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात १ ऑक्टोबर २०२४ रोजी ७ विकेट्सने विजय मिळवला.

Team India | Sakal

मालिका विजय

या विजयबरोबरच भारताने दोन सामन्यांची मालिकाही २-० फरकाने जिंकली आहे.

India vs Bangladesh | Sakal

मालिकावीर आर अश्विन

या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार अनुभवी अष्टपैलू आर अश्विनला मिळाला. अश्विनने या मालिकेत एक शतक करण्याबरोबरच ११ विकेट्सही घेतल्या.

Team India | R Ashwin | Man of the Series | Sakal

मालिकावीर

अश्विनने कसोटीमध्ये मालिकावीर पुरस्कार मिळवण्याची ही ११ वी वेळ होती. त्यामुळे त्याने दिग्गज मुथय्या मुरलीधरनच्या सर्वाधिकवेळा कसोटीत मालिकावीर पुरस्कार जिंकण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.

Team India | R Ashwin | Sakal

मुथय्या मुरलीधरन

मुरलीधरननेही कसोटीत ११ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.

Muttiah Muralitharan | X/ICC

जॅक कॅलिस

कसोटीत सर्वाधिकवेळा मालिकावीर पुरस्कार जिंकणऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ९ वेळा मालिकावीर जिंकला आहे.

Jacques Kallis | X/ICC

इम्रान खान, रिचर्ड हॅडली आणि शेन वॉर्न

यानंतर इम्रान खान, रिचर्ड हॅडली आणि शेन वॉर्न यांनी प्रत्येकी ८ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.

Imran Khan, Richard Hadlee, Shane Warne | Sakal

6,6...रोहित शर्माची वादळी सुरुवात; याआधी असं 'या' तिघांनाच जमलंय

Rohit Sharma | Sakal
येथे क्लिक करा