Pranali Kodre
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला कसोटी सामना झाला.
या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्रने (Rachin Ravindra) शानदार शतकी खेळी करत विक्रमही केला आहे.
त्याने १५७ चेंडूत धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ षटकार आणि १३ चौकार मारले.
रचिन भारतात कसोटीमध्ये शतक करणारा न्यूझीलंडचा चौथा युवा खेळाडू ठरला आहे.
रचिनने हे शतक ठोकले तेव्हा त्याचे वय २४ वर्षे ३३५ दिवस होते.
न्यूझीलंडसाठी सर्वात कमी वयात भारतात पहिले कसोटी शतक ठोकण्याचा विक्रम केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नावावर आहे. विलियम्सनने भारतात पहिले शतक केले तेव्हा त्याचे वय २० वर्षे ८८ दिवस होते.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जॉन गाय (John Guy) आहे. त्यांनी भारतात पहिले शतक केले तेव्हा त्यांचे वय २१ वर्षे ८२ दिवस होते.
तिसऱ्या क्रमांकावर ब्रुस टेलर (Bruce Taylor) असून त्यांनी भारतात पहिले शतक केले तेव्हा त्यांचे वय २१ वर्षे २३६ दिवस होते.