Pranali Kodre
न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला बंगळुरूला झालेल्या कसोटी सामन्यात ८ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.
न्यूझीलंडच्या या विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू रचिन रविंद्रने मोलाचा वाटा उचलला.
रचिनने न्यूझीलंडसाठी पहिल्या डावात १३४ धावांची खेळी केली. तसेच त्याने दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावा केल्या.
त्याच्या खेळासाठी त्याला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
त्यामुळे जेव्हापासून क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्काराची सुरुवात झाली, तेव्हापाजॉन ब्रेसवेलसून रचिन भारतात कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा न्यूझीलंडचा चौथाच क्रिकेटपटू ठरला.
भारतात सर्वात पहिल्यांदाच कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार जॉन ब्रेसवेल यांनी जिंकला होता. त्यांनी १९८८ साली वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडसाठी ५२ आणि ३२ धावांची खेळी केली होती. तसेच पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर २००३ साली मोहालीत झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा डॅरिल टफी सामनावीर ठरला होता. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या होत्या.
ब्रेंडन मॅक्युलमने २०१० साली हैदराबादला झालेल्या कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला होता. त्याने दुसऱ्या डावात २२५ धावांची दमदार खेळी केली होती. (Rachin Ravindra fourth New Zealand player to win Player of the Match award in Test in India)