Monika Lonkar –Kumbhar
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला मुंबईत पार पडला.
राधिकाने तिच्या लग्नात, रिसेप्शनला आणि प्री-वेडिंग सोहळ्यांना परिधान केलेले आऊटफीट्स अप्रतिम होते.
तिने या महागड्या लेहेंग्यांवर परिधान केलेली ज्वेलरी देखील चर्चेत आली होती.
राधिकाने तिच्या बोटांमध्ये घातलेली ही डबल रिंगची अंगठी डायमंडपासून बनली आहे. अंगठीच्या मधोमध बदाम, बाजूने राधिकाचा R आणि अनंतचा A दिसून येत आहे.
राधिकाच्या या आगळ्यावेगळ्या अंगठीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
राधिकाने तिच्या दुपट्ट्यावर एआर ब्रोच लावला असून, हा ब्रोच हिरा आणि नीलमच्या मौल्यवान खड्यांपासून बनवण्यात आला आहे.
राधिकासाठी ही अनोखी हिऱ्याची अंगठी खुद्द अनंतने पसंत केली आहे.