Sudesh
मटेरिअल्स व डिझाइनच्या नावीन्यतेसाठी स्वित्झर्लंड येथील रॅडो हा घड्याळांचा ब्रँड जगप्रसिद्ध आहे.
या स्विस वॉच ब्रँडने ‘इंडिया आर्ट फेअर २०२४’ येथे ‘अॅनाटोम’ची अॅनव्हर्सरी एडिशन लाँच केली.
या एडिशनमध्ये रॅडो घड्याळांचा ४० वर्षांचा वारसा सामावलेला आहे.
नवीन अॅनाटोममध्ये आकर्षक वक्राकार एज-टू-एज सफायर क्रिस्टल आणि हाय-टेक सिरॅमिक केस असून, ती मनगटावर उत्तमरीत्या फिट बसते.
पहिले अॅनाटोम घड्याळ १९८३ मध्ये लाँच करण्यात आले होते आणि मनगटावर फिट बसण्यासह एर्गोनॉमिक्स आकारामुळे या घड्याळाने जगाचे लक्ष वेधून घेतले.
पूर्वीच्या घड्याळांच्या खऱ्याखुऱ्या तत्त्वाला कायम राखत रॅडोच्या ‘आर अँड डी’ टीमने या आयकॉनिक उत्पादनाला नवीन लुक दिला आहे.
याप्रसंगी ‘रॅडो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड्रियन बोशार्ड म्हणाले, "अॅनाटोम जर्नीमधील नवीन क्रांतिकारी वॉचला सादर करण्याचा मला अभिमान वाटत आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.