सकाळ डिजिटल टीम
दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा वन-डे सामना अफगाणिस्तानने १७७ धावांनी जिंकला. या विजयासोबतच अफगाणिस्ताने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन वन-डे सामन्यांपैकी सलग २ सामने जिंकून अफगाणिस्तानने मालिकेत आघाडी घेतली आहे.
या सामन्यामध्ये रहमानुल्लाह गुरबाजने त्याचे ७वे वन-डे शतक झळकावले व अफगाणिस्तानच्या सर्वाधिक वन-डे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान गाठले.
राशिद खानने या सामन्यात १९ धावांमध्ये ५ विकेट्स घेतले व आपल्या वाढदिवशी नवा विक्रम रचला. या यादीत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरनॉन फिलँडरला मागे टाकून अव्वल स्थान मिळवले.
दक्षिण आफ्रिकेसाठी १७७ धावांनी हा वन-डे मधील ५वा सर्वात मोठा पराभव आहे. या यादीत भारत २४३ धावांसह पहिल्या स्थानी तर पाकिस्तान १८२ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.
अफगाणिस्तानचा वन-डे मधील १७७ धावांसह हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी त्यांनी झिम्बाब्वेला १५४ धावांनी हरवले होते.
वयाच्या २३ वर्षाआधी सर्वाधिक वन-डे शतकांमध्ये रहमनुल्लाह गुरबाजने ७व्या वन-डे शतकासह पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडला आहे, तर विराट कोहलीच्या ७ शतकांची बरोबरी केली आहे.
वयाच्या २३ वर्षांआधी सर्वाधिक वन-डे शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक ८ शतकांसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ विराट कोहली आणि गुरबाज ७ शतकांसह आहेत.