ज्युनियर द्रविड दिसताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Pranali Kodre

राहुल द्रविड

राहुल द्रविडने त्याच्या खेळाडू म्हणून कारकि‍र्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. मोठ्या धावा करत भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलं आहे.

Rahul Dravid | Sakal

ज्युनियर द्रविड

पण आता ज्युनियर द्रविडला क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहे.

Samit Dravid | Sakal

समित

द्रविडचा मुलगा समित हा देखील क्रिकेटपटू असून तो वयोगटातील क्रिकेट खेळला आहे.

Samit Dravid | Sakal

महाराजा ट्रॉफी

आता समितने नुकतेच महाराजा ट्रॉफी या स्पर्धेत पदार्पण केले आहे. महाराजा ट्रॉफी ही कर्नाटकमधील टी२० लीग स्पर्धा आहे.

Samit Dravid | Sakal

म्हैसूर वॉरियर्स

समित या स्पर्धेत म्हैसूर वॉरियर्स संघाकडून खेळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्रविडचं नाव एका क्रिकेट संघात पाहून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

Samit Dravid | Sakal

७ धावा

समितने यापूर्वी वयोगटातील क्रिकेटमध्ये अनेकदा चांगल्या खेळी केल्या आहेत. मात्र त्याला महाराजा ट्रॉफीमधील पहिल्या सामन्यात फारसा प्रभाव पाडला आला नाही. समित नम्मा शिवामोग्गा संघाविरुद्ध ७ धावांवर बाद झाला.

Samit Dravid | Sakal

चर्चा

पण असं असलं तरी आता वरिष्ठ क्रिकेट लीगमध्ये द्रविडचा मुलगा क्रिकेट खेळताना दिसल्याने अनेकांनी त्याबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत.

Samit Dravid | Sakal

धोनी अन् रैना १५ ऑगस्ट २०२० रोजी का निवृत्त झाले होते?

MS Dhoni - Suresh Raina | Sakal
येथे क्लिक करा