Pranali Kodre
गेल्या काही काळात अनेक खेळाडूंवर बोयोपिक आले आहेत. याच एमएस धोनी, मेरी कोम, सायना नेहवाल अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
नुकताच अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगच्या बायोपिकचीही घोषणा झाली आहे.
अशातच राहुल द्रविडलाही CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कारादरम्यान जर त्याच्यावर बायोपिक आला,तर कोणत्या अभिनेत्याने त्याची भूमिका करावी, असं विचारण्यात आले.
द्रविडने यावेळी भन्नाट उत्तर दिलं. तो हसून म्हणाला, 'जर पैसे चांगले मिळणार असतील, तर मीच माझी भूमिका करेल.'
द्रविडची कारकिर्द मोठी राहिली आहे. त्याने ५०९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४२०८ धावा केल्या आहेत, ज्यात ४८ शतके आणि १४६ अर्धशतके आहेत. त्याने या दरम्यान काही काळ नेतृत्वाची आणि यष्टिरक्षकाचीही जबाबदारी सांभाळली.
त्याने निवृत्तीनंतर प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. त्याच्या मार्गदर्शनाखाली २०१८ मध्ये १९ वर्षांखालील भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. तसेच २०२४ टी२० वर्ल्ड कप भारताच्या वरिष्ठ संघाने द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली जिंकला.
द्रविडने दिलेलं योगदान पाहाता त्याला CEAT क्रिकेट रेटिंग (CCR) पुरस्कार २०२४ सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.