संतोष कानडे
भारतामध्ये दररोज साधारण दहा कोटींपेक्षा जास्त लोक ट्रेनने प्रवास करतात
आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी अगोदरच बुकिंग करावं लागतं आणि जे सीट मिळालं आहे त्यावरुनच प्रवास करावा लागतो
परंतु अनेकदा सीटवरुन भांडणं होताना दिसून येतात. काही प्रवाशी जबरदस्तीने आरक्षित सीटवर बसतात
यावर सोपा उपाय म्हणजे 139 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करता येतो किंवा रेल्वेची अधिकृत वेबसाईट Rail Madad वर तक्रार करता येते
139 क्रमांकावर केवळ मेसेज करुन आपण आपली तक्रार टीसीकडे करु शकतो. त्यानंतर तिथे टीसी येऊन तुम्हाला मदत करेल
उदाहरणार्थ, (PNR Number) (Seal Number) OCCUPIED BY UNKOWN PASSENGER असा मेसेज केल्यास 139 वर करावा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या सीटचे डिटेल्स मिळतील आणि तक्रार केल्याने टीसी तिथे येऊन तुम्हाला तुमचं सीट देईन
तुम्हाला त्या सीटचे डिटेल्स संबंधित प्रवाशाला दाखवून तुमचं सीट मिळवता येईल
यामुळे तुमचा वेळ वाचतो शिवाय नको त्या लोकांशी भांडायची गरज पडणार नाही