kimaya narayan
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांचं नाव घेतलं जातं.
राजेश खन्ना यांनी बॉलिवूडवर एक दशक राज्य केलं. त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.
राजेश खन्ना यांनी जुहूला समुद्र किनाऱ्याजवळ बंगला बांधला. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना एक सल्ला दिला.
राजेश यांना त्यांच्या वडिलांनी बंगल्याचं नाव आशीर्वाद ठेवायला सांगितलं. म्हणजे कोणत्या व्यक्तीला तुझ्यावर टीका जरी करायची असे तरीही त्याला पत्र लिहिताना आशीर्वाद लिहावंच लागेल असा त्यांचा युक्तिवाद होता.
राजेश यांना वडिलांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी त्यांच्या बंगल्याचं नाव आशीर्वाद असंच ठेवलं.
राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबाने हा बंगला विकला.