Anuradha Vipat
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे.
आता राखी तिच्या जुन्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. मुलाखतीत राखीने फिल्म इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
मुलाखतात राखी म्हणताना दिसतेय का, ‘फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधी बलात्कार होत नाही. मुली स्वतः नको त्या गोष्टींसाठी पुढाकार घेतात.
त्यांना ऑडिशन द्यायचं नसतं. अभिनय शिकायचा नसतो. डान्स शिकायचा नसतो… मुलींना काहीही शिकायचं नसतं असंही राखी या मुलाखतीत म्हणाताना दिसत आहे
‘व्हिडीओ तयार केल्यानंतर सतत निर्मात्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक व्हिडीओ माझ्याकडे आहेत असंही राखी या मुलाखतीत म्हणाताना दिसत आहे
‘मी मुलींना कायम सांगते 100 ठिकाणी जा, ऑडिशन द्या. शॉर्ट कपडे घाला. तुम्ही मला पाहा, मी पूर्ण तयार होऊन बाहेर निघते. कारण माझं पोट त्यावर आहे, राखीचा हा व्हिडीओ जुना असला तरी तुफान व्हायरल होत आहे.