Anuradha Vipat
बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतला तिचा खासगी व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी तिच्या एक्स पतीने दाखल केलेल्या गुन्ह्यात मुंबई न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.
दिंडोत्री सत्र न्यायालयाने राखीचा जामीन अर्ज ८ जानेवारी रोजी फेटाळला. न्यायालयाचा सविस्तर आदेश शुक्रवारी उपलब्ध झाला.
तिचा विभक्त पती आदिल खान दुर्रानी याच्या तक्रारीच्या आधारे राखी सावंत विरुद्ध उपनगर अंबोली पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राखीने आपली बदनामी करण्यासाठी अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्याचे वैयक्तिक व्हिडिओ दाखवल्याचा आरोप आदिलने केला होता.
वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जात राखी सावंतने म्हटले आहे की, तिच्याविरुद्ध एफआयआर हा त्रास देण्याच्या, दबाव आणण्याच्या आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आला आहे.
तिच्या अर्जात असे म्हटले आहे की एफआयआर हे कायद्याच्या प्रक्रियेचा पूर्णपणे गैरवापर करण्याशिवाय दुसरे काहीही नाही आणि त्यात काहीही तथ्य नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.