Pranali Kodre
रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्यात गोडवा आणणारा आहे. प्रत्येकाचेच आपल्या भावंडाबरोबर खास बाँड असतो.
अनेक भारतीय क्रिकेटपटूही आहेत, ज्यांचे आपल्या भावंडांबरोबर अगदी खास नाते आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटपटूंचे त्यांच्या बहिणीसोबतचे खास फोटो पाहू.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचं त्याच्या मोठ्या बहिणीबरोबर खूपच खास नातं आहे. तो तिच्याबरोबरचे फोटोही शेअर करत असतो.
भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा डान्सर असून हे दोघे बहीण-भाऊ अनेकदा एकमेकांबरोबर मस्ती करतानाचे व्हिडिओही शेअर करत असतात.
शुभमन गिलचे त्याची मोठी बहिण शाहनीसबरोबर चांगले बाँडिंग असून ती बऱ्याचदा त्याला स्टेडियममधून चिअर करतानाही दिसते.
विराटला मोठी बहिण असून तिचं नाव भावना आहे. विराट त्याच्या बहिणीची खूप जवळ असून ते अनेकदा एकमेकांबद्दल बोलतानाही दिसतात.
जसप्रीत बुमराहच्या बहिणीचे नाव जुहिका असून तिच्याबरोबर त्याचे खूप चांगले बाँडिंग आहे.
दीपक चाहरची बहीण मालती ही बऱ्याच जणांना माहित आहे. ती आयपीएलवेळी बऱ्याचदा स्टेडियममध्ये भावाला चिअर करण्यासाठी उपस्थित असते.
अर्जुन आणि सारा ही तेंडुलकर भावंडही अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात.
अजिंक्य रहाणेला लहान बहीण अपूर्वा आणि भाऊ शशांक आहे. त्याचे त्यांच्याबरोबरही खूप चांगलं नातं आहे.