सकाळ वृत्तसेवा
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधन सण साजरा केला
बारा वर्षांपासून दुरावलेले बहीण-भाऊ २०२३ मध्ये कौटुंबिक पातळीवर एकत्र आले
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजांसाठी कष्ट घेतले होते
परंतु बीड लोकसभा निवडणुकीत पंकजांचा पराभव झाला. पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्याने मुंडे कुटुंबाचा एक वेगळा दबदबा राज्यात निर्माण झाला आहे
धनंजय मुंडेंनी पंकजांच्या घरी जावून सर्वांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला
मधल्या बारा वर्षांमध्ये महादेव जाणकर हे पंकजांकडून राखी बांधून घेत होते
यंदाही जाणकरांनी पंकजा मुंडेंच्या घरी जावून त्यांच्याकडून राखी बांधून घेतली
मुंडे कुटुंबियांच्या रक्षाबंधनाचे फोटो व्हायरल झाले आहेत