Pranali Kodre
रक्षाबंधनाचा सण हा भाऊ-बहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा आहे.
आपल्या भावंडांबरोबर प्रत्येकाच्या खूप खास आणि अनेक कडू-गोड आठवणी असतात.
याचनिमित्त आपण अशा भाऊ-बहिणींच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळले आहे.
न्यूझीलंडच्या दिग्गज फलंदाजांमध्ये नॅथन एस्टलचे नाव घेतले जाते. ११ हजारांहून अधिक धावा केलेल्या नॅथनची बहिण लिसा ही देखील क्रिकेटपटू असून तिनेही न्यूझीलंडकडून एक वनडे सामना खेळलाय.
ऑल्ट्रेलियाच्या महिला संघातील प्रमुख खेळाडूंपैकी ऍनाबेल सदरलँड ही देखील एक आहे. तिच्याबरोबरच तिचा भाऊ विल सदरलँड यानेही २०२४ मध्येच ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाकडून पदार्पण केले आहे.
न्यूझीलंडची माजी महिला क्रिकेटपटू सारा मॅकग्लाशनने २१२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. तिचा भाऊ पीटर यानेही न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले असून १५ सामने खेळले आहेत.
गोर्डन स्कॉटलंड संघाकडून क्रिकेट खेळला आहे. तसेच त्याची धाकटी बहिण ऍनेट ही देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली आहे.
क्रिकेटमधील जॉयस हे असं कुटुंब आहे, ज्यांच्या कुटुंबातील चार सख्खी भावंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली आहे. एड, डॉम, इसाबेल आणि सेसेलिया या चौघांनीही क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली आहे.