Anuradha Vipat
21 फेब्रुवारी रोजी रकुलने निर्माता जॅकी भगनानीशी लग्न केलं.
लग्नानंतर ती नुकतीच ‘लॅक्मे फॅशन वीक 2024’मध्ये ग्लॅमरस अंदाजात झळकली
यावेळी लग्नानंतर सासरचे मंडळी तुला विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास सांगतात का, असा प्रश्न विचारणाऱ्याला अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सडेतोड उत्तर दिलं आहे.
रकुल म्हणाली, “नाही, माझ्या आणि जॅकीच्या कुटुंबीयांबाबत मी खूप नशीबवान ठरले आहे. तुम्ही एखाद्या पुरुषालाही हाच प्रश्न विचारणार का? लग्नानंतर तू तुझ्या पोशाखात बदल करशील का, असा सवाल तुम्ही पुरुषाला कराल का? ऑफिसला तू अत्यंत चमकणारे कपडे घालून जा, असं आपण सांगू का? नाही ना.
जॅकी आणि रकुलच्या लग्नाला बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते.
लॉकडाऊनदरम्यान एकमेकांशी जवळीक वाढल्याचं रकुलने एका मुलाखतीत सांगितलं होतं.