आशुतोष मसगौंडे
राकुल प्रीत सिंगने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपली खास ओळख निर्माण केली आहे.
रकुलने केवळ तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येच अनेक सुपरहिट चित्रपट केले नाहीत, तर हिंदी चित्रपटसृष्टीत दे दे प्यार दे, रनवे ३४, डॉक्टर जी आणि छत्रीवालीसारखे अनेक चित्रपट केले आहेत.
चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना राकुलने आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या ती अजय देवगण आणि आर माधवनसोबत तिच्या आगामी 'दे दे प्यार दे २'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
या दरम्यान तिने एका मुलाखतीत बॉलीवूडमधील नेपोटिझमबद्दल आपले म्हणणे स्पष्टपणे मांडले आहे. ती नुकतीच 'द रणवीर शो'मध्ये पोहोचली होती.
यादरम्यान ती नेपोटिझमबद्दल बोलली. तिने कबूल केले की तिने आपल्या करिअरमध्ये घराणेशाहीमुळे चित्रपट गमावले; परंतु तिने त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले.
ती म्हणाली, "हो, असं होतं, आणि मी चित्रपट गमावले; पण मी अशा प्रकारची व्यक्ती नाही जी तीच गोष्ट घेऊन बसेल. कदाचित ते चित्रपट माझ्यासाठी बनवलेले नसतील.
जीवनातील चढ-उतार समजून घेणे हे प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. माझ्या हातून काही चित्रपट गेले त्याचा विचार करीत मी बसले नाही. सतत नावीन्याचा विचार केला, असे रकुल म्हणाली.
दरम्यान रकुल प्रीत काही महिन्यांपूर्वीच अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीशी विवाह बंधनात अडकली आहे.