Sandip Kapde
रामलल्लाच्या अभिषेकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचे कडक उपवास सोडला
अयोध्येत प्रभू रामाचा अभिषेक झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हातून चरणामृत घेऊन 11 दिवसांचे उपवास पूर्ण केले.
पंतप्रधान मोदींनी 12 जानेवारीला नाशिकच्या काळा राम मंदिरात 11 दिवसांच्या विशेष विधीची सुरुवात केली होती.
नरेंद्र नाशिक धाम- पंचवटी येथून धार्मिक विधी सुरू केले होते, जेथे भगवान श्रीरामांनी महत्त्वपूर्ण वेळ घालवला होता.
श्रीराम भक्तांची सुमारे 500 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा सोमवारी संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधीच्या विधीमध्ये भाग घेतला.
सोनेरी रंगाचा कुर्ता, क्रीम रंगाचे धोतर आणि उत्तरी परिधान केलेले पंतप्रधान मोदी नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत गेले.
कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि गर्भगृहात प्रवेश केला.
यावेळी पंतप्रधानांनी हातात लाल कपड्यात गुंडाळलेली चांदीची छत्रीही आणली.
गर्भगृहात पंतप्रधान मोदींनी पंडितांच्या मंत्रोच्चारात विधींना सुरुवात केली.
PM मोदींनी प्राणप्रतिष्ठा विधीसाठी 'संकल्प' घेतला. श्री रामजन्मभूमी मंदिरातील राम लालाच्या पुतळ्याची पहिली झलक मंत्रमुग्ध करणारी होती.
यावेळी मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माथा टेकवून रामललाचे आशीर्वाद घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामलल्लाच्या पुतळ्याला साष्टांग नमस्कार घातला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.