Payal Naik
'पंढरीची वारी' चित्रपटाची प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा आहे. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो.
मात्र या चित्रपटासाठी जयश्री गडकर यांच्या आधी अभिनेत्री रंजना देशमुख यांची निवड झाली होती.
रंजना आणि अरुण सरनाईक यांच्या जोडीने या चित्रपटाचं जवळपास ७० टक्के शूटिंग पूर्ण केलं होतं.
मात्र एकेदिवशी शुटिंगहून परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.
त्या अपघातात रंजना यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
त्यानंतर रंजना यांना चालणं अशक्य झालं. निर्मात्यांनी खूप वाट पाहिली मात्र त्या कधीही बऱ्या झाल्या नाहीत.
शेवटी त्यांची परवानगी घेऊन निर्मात्यांनी जयश्री गडकर यांना मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट केलं.
तर वर्षभराने रंजना यांचं निधन झालं. तो अपघात घडला नसता तर 'पंढरीची वारी' रंजना यांनी केला असता.