Atlas Moth : नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळ्यात आढळले नागाचे 'फुलपाखरू'

सकाळ डिजिटल टीम

'ॲटलास माॅथ'

जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी (फुलपाखरू) एक असलेले ‘ॲटलास माॅथ’ शिराळ्यात पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात दिसले आहे.

Atlas Moth Butterfly | esakal

नागाच्या तोंडाचा आकार

पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार होता. त्यामुळे शिराळ्यात नागाचे फुलपाखरू आले ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.

Atlas Moth Butterfly

अकरा इंच मोठा पतंग

शिराळा येथील व्यावसायिक संजय यादव, राजेंद्र सावंत, सुनंदा सावंत, पूजा सावंत यांनी हे फुलपाखरू पाहिले. जवळपास अकरा इंच मोठा पतंग होता.

Atlas Moth Butterfly

शिराळ्यातील नागपंचमी जगप्रसिद्ध

याच्या दोन्ही पंखांच्या टोकाला नागाचे तोंड व आकार दिसत होता. शिराळ्यातील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे.

Atlas Moth Butterfly

नागाचे तोंड असलेले फुलपाखरू

तशातच येथे नागाचे तोंड असलेले फुलपाखरू आढळल्यामुळे अनेकांनी मोबाइलवर फोटो काढले.

Atlas Moth Butterfly

पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे ठिपके

या 'ॲटलास माॅथ'चा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला ॲटलास माॅथ म्हणतात.

Atlas Moth Butterfly

पतंगाचे आयुष्य जेमतेम

याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट, अळी असतानाच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असते.

Atlas Moth Butterfly

लिंबू, जांभूळ, पेरू, लिंबू झाडांवर वावर

सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात हे प्रकर्षाने दिसतात. हा पतंग दालचिनी, लिंबू, जांभूळ, पेरू व लिंबू वर्गीय झाडांवरच आढळतो.

Atlas Moth Butterfly

गुलाबी पेरू आरोग्यासाठी खजिन्यापेक्षा कमी नाही; डॉक्टरही का देतात फळं खाण्याचा सल्ला?

Pink Guava Benefits | esakal
येथे क्लिक करा