सकाळ डिजिटल टीम
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा थाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने.
पुष्पा स्टाईलमध्ये एंट्री घेत रश्मिकाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. याबरोबर या कार्यक्रमासाठी तिने केलेला लूकही चर्चेत राहिला.
गडद निळ्या रंगाची साडी आणि त्याला साजेसा चमकदार निळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज या लूकमध्ये रश्मिकाने रेड कार्पेटवर चारचाँद लावले.
केसात गजरा, गळ्यात साडीला शोभेल असा नेकलेस, कानात इअररिंग्ज आणि हातात बांगड्या या तिच्या लूकने सगळ्यांनाच भुरळ घातली.
रश्मिकाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले असून या फोटोंना 'आजकाल मला माझ्या आवडीच्या मिठायांपेक्षा साड्या जास्त आवडू लागल्या आहेत.' असं कॅप्शन दिलं आहे.
सोशल मीडियावर तिचा लूक व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं.