रोहित कणसे
गेल्या एका वर्षात टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी जबरदस्त रिटर्न्स दिले आहे. त्यामुळे समूहाच्या मार्केट कॅपमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
विशेष बाब म्हणजे टाटा समूहाचे मार्केट कॅप हे पाकिस्तानच्या एकूण जीडीपीपेक्षा देखील जास्त झाले आहे.
टाटा समूहाची एकूण मार्केट कॅप 365 अब्ज डॉलर्स म्हणजेच 30.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे, आयएमएफनुसार, पाकिस्तानचा एकूण जीडीपी 341 अब्ज डॉलर इतकाच राहिला आहे.
टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी TCS बद्दल बोलयाचे झाल्यास तिचे व्हॅल्युएशन 170 अब्ज डॉलर्स म्हणजेच 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.
गेल्या एका वर्षात टाटा कंपन्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे.
टाटा समूहातील कंपन्यांमध्ये TRF, ट्रेंट, बनारस हॉटेल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि आर्टसन इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे.
टाटा समूहाच्या एम-कॅपमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षभरात समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली प्रचंड वाढ झाली आहे.
एकाच कसोटीत शतक अन् 5 विकेट्स! जडेजा शेर तर अश्विन सव्वाशेर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.