राहुल शेळके
रतन टाटा यांचे मृत्युपत्र उघड झाले असून, त्यात काही लोकांची नावे समोर आली आहेत. विशेषत: चार लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे.
रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात त्यांचा कुक, भाऊ जिम्मी, सावत्र बहिणी शिरीन आणि डायना जीजीभॉय, शंतनू नायडू आणि पाळीव श्वान टिटो यांचीही नावे आहेत.
रतन टाटा यांची एकूण संपत्ती 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
रतन टाटा यांच्या मालमत्तेत अलिबागमधील 2000 चौरस फुटांचा समुद्रकिनारी असलेला बंगला, मुंबईतील जुहू तारा रोडवरील 2 मजली घराचा समावेश आहे.
याशिवाय 350 कोटींहून अधिक मुदत ठेवी आणि टाटा सन्स जी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे त्यातील 0.83% स्टेक यांचा समावेश आहे.
हे सर्व रतन टाटा एन्डॉमेंट फाऊंडेशनला दिले जाणार आहे. रतन टाटा यांनी फाउंडेशन, भाऊ जिमी टाटा, सावत्र बहिणी शिरीन आणि डीआना जीजीभॉय, घरातील कर्मचारी आणि इतरांना त्यांच्या इच्छापत्राचा भाग बनवला आहे.
या अहवालात कोणाला काय मिळाले हे उघड झाले नसले तरी त्यांचे निकटवर्तीय शंतनू नायडू याच्याविषयी तपशील समोर आला आहे.
अहवालानुसार, टाटांनी नायडूच्या शिक्षणासाठी घेतलेले वैयक्तिक कर्ज माफ केले आहे.
एवढेच नाही तर त्यांनी नायडूच्या सर्व व्यवसायातील आपली हिस्सेदारी सोडली आहे.
रतन टाटा यांनीही आपल्या श्वानाची आजीवन काळजी घेण्याचा उल्लेख केला आहे.