सकाळ डिजिटल टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे सर्वांत मोठे श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
राणेंनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:सह पत्नी नीलम राणे (Neelam Rane) आणि कुटुंबाची मिळून सुमारे १३७ कोटींहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे.
त्यांची वैयक्तिक मालमत्ता सुमारे ३५ कोटींची आहे. त्यांच्यासह पत्नी व कुटुंबीयांवर सुमारे २८ कोटींहून अधिकचे कर्जही असल्याचे नमूद केले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदार संघात महायुतीकडून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
राणेंकडे १ कोटी ७६ लाख ९६ हजार ५३६ रुपयांचे २५५२.२५ ग्रॅम सोने तर ७८ लाख ८५ हजार ३७१ रुपयांचे डायमंड आहेत.
सौ. नीलम राणेंकडे १ कोटी ३१ लाख १७ हजार ८६७ रुपयांचे १८१९.९० ग्रॅम वजनाचे सोने आहे. १५ लाख ३८ हजार ५७२ रुपयांचे डायमंड आणि ९ लाख ३१ हजार २०० रुपयांची चांदी आहे.
नारायण राणेंच्या नावावर इनोव्हा, मर्सिडिज बेंज, मारुती इर्टिगा तर नीलम राणे यांच्या नावावर दोन स्कोडा, इको गाडी आणि कुटुंबीयांच्या नावावर मर्सिडिज बेंज या गाड्या आहेत.